Skip to content
इय्योब ४१:१४-२१

इय्योब ४१:१४-२१

१४
जी भयानक दातांनी घेरलेली आहे, अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे?
१५
त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत;
१६
ती एकमेकांना इतकी जखडून आहेत की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही.
१७
ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत; ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत.
१८
त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात; त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत.
१९
त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात; अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात.
२०
जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो.
२१
त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो, आणि त्याच्या मुखातून तापलेल्या ज्वाला पडतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options