इय्योब ३३:२३-२८
२३
तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत, हजारांमधला कोणी एक मनुष्य निरोप्या असला, जो न्यायी जीवन कसे जगावे याविषयी सांगण्यासाठी पाठविलेला असला,
२४
आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो, ‘त्यांना मरणाकडे जाण्यापासून वाचवा; त्यांच्यासाठी खंडणी मला मिळाली आहे—
२५
लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो; तरुणपणाच्या दिवसांप्रमाणे त्यांची पुनर्रचना होवो’;
२६
मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.
२७
मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील, ‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले, परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.
२८
परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले, आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’
Settings