इय्योब ३०:२४
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २४ दाखवत आहे.
२१
तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता.
२२
तुम्ही मला ओढून वार्यावर उडवून टाकता, आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे.
२३
मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात, अशा ठिकाणी जे सर्व जीवितांसाठी नेमण्यात आले आहे.
२४
“पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो तेव्हा खचितच कोणीही त्याला हात देत नाही.
२५
संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय?
२६
तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले; आणि मी प्रकाशाची वाट पाहिली, पण अंधकार आला.
२७
माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही; क्लेशाचे दिवस माझ्याशी सामना करतात.
Settings