Skip to content
इय्योब ३०:२०

इय्योब ३०:२०

आजूबाजूच्या संदर्भासह वचन २० दाखवत आहे.
१७
रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; मला छळणार्‍या वेदना थांबत नाहीत.
१८
परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; वस्‍त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत.
१९
परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे, मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे.
२०
“हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत; मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता.
२१
तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता.
२२
तुम्ही मला ओढून वार्‍यावर उडवून टाकता, आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे.
२३
मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात, अशा ठिकाणी जे सर्व जीवितांसाठी नेमण्यात आले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options