इय्योब ११:१५-१९
१५
तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.
१६
तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील.
१७
तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.
१८
आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.
१९
तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.
Settings