इय्योब १०:४-१०
४
तुम्हाला मानवी डोळे आहेत का? मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?
५
तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का, किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,
६
म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;
७
मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही?
८
“तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
९
तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?
१०
दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,
Settings