यिर्मयाह ६:१६-२१
१६
याहवेह असे म्हणतात: “चौरस्त्यावर उभे राहा व पाहा; पुरातन मार्गाची विचारणा करा, तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा, तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल. परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’
१७
मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
१८
म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका; तुम्ही माझे साक्षीदार आहात, त्यांचे काय होईल ते समजून घ्या.
१९
हे पृथ्वी तू ऐक: मी या लोकांवर महासंकट आणत आहे, त्यांच्याच कारस्थानाचे फळ, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही आणि माझे नियम नाकारले.
२०
शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग? तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही; तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.”
२१
म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी या लोकांच्या मार्गात अडथळे पाठवेन. त्यावर मातापिता आणि लेकरे सारखेच अडखळतील. शेजारी आणि मित्र नाश पावतील.”
Settings