Skip to content
यिर्मयाह ५:१०-१९

यिर्मयाह ५:१०-१९

१०
“त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.
११
इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.
१२
ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही.
१३
संदेष्टे निव्वळ वारा आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.”
१४
म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.”
१५
याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.
१६
त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत.
१७
ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.
१८
“परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात.
१९
जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options