Skip to content
यिर्मयाह ४८:४०-४७

अटळ विनाश आणि भविष्यातील आशा

यिर्मयाह ४८:४०-४७
४०
याहवेह असे म्हणतात: पाहा! एक गरुड आकाशातून खाली झेप घेत आहे, मोआबभूमीवर आपले पंख पसरवित आहे.
४१
करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.
४२
मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.
४३
हे मोआबातील लोकांनो, दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील, असे याहवेह म्हणतात.
४४
“जो कोणी दहशतीपासून दूर पळेल तो खड्ड्यात पडेल, जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल, तो पाशात सापडेल. कारण मी मोआबावर तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे. याहवेह असे जाहीर करतात.
४५
“हेशबोनच्या सावलीत फरारी हतबलपणे उभे आहेत, हेशबोनमधून अग्नी येत आहे, सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.
४६
हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.
४७
“परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options