Skip to content
यिर्मयाह ४२:१३-१७

यिर्मयाह ४२:१३-१७

१३
“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,
१४
आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’
१५
तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल,
१६
तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल.
१७
तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्‍या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options