Skip to content
यिर्मयाह ३६:९-१५

यिर्मयाह ३६:९-१५

योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.
१०
शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.
११
शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,
१२
तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते.
१३
नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.
१४
तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला.
१५
ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options