Skip to content
यिर्मयाह ३१:३५-३७

कराराचे चिरस्थायी स्वरूप

यिर्मयाह ३१:३५-३७
३५
याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:
३६
“जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.
३७
याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options