यिर्मयाह २७:८-११
८
“ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.
९
तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.
१०
कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल.
११
परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.