Skip to content
यिर्मयाह २६:१६-१९

निर्णय आणि ऐतिहासिक उदाहरण

यिर्मयाह २६:१६-१९
१६
यावर अधिकारी व लोक, याजकांना आणि संदेष्ट्यांना उद्देशून म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडाला पात्र नाही, कारण तो आमचे परमेश्वर याहवेहच्या नावाने आमच्याशी बोलला आहे.”
१७
नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले,
१८
“यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’
१९
“परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options