मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह २४:८-१०

वाईट अंजीरे: उरलेल्यांवर न्याय

यिर्मयाह २४:८-१०
“ ‘परंतु नासके अंजीर जे इतके नासके आहेत की ते खाण्यायोग्य नाहीत, हे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी व या देशात उरलेले यरुशलेमचे सर्व लोक यांचे प्रतीक आहेत; मग ते यरुशलेमचे अवशिष्ट लोक असोत वा इजिप्तमध्ये वस्ती करून राहिलेले असोत, याहवेह म्हणतात.
मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप आणि ते उपहासाचा विषय होतील.
१०
त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options