Skip to content
यिर्मयाह २४:१-५

यिर्मयाह २४:१-५

१
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.
२
एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्‍या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते.
३
तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”
४
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
५
“याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options