Skip to content
यिर्मयाह १७:१९-२२

यिर्मयाह १७:१९-२२

१९
याहवेह मला असे म्हणाले: “जा आणि लोकांच्या प्रवेश दारावर उभा राहा. ज्या प्रवेश दारांनी यहूदीयाचा राजा प्रवेश करतो; आणि यरुशलेमच्या इतर सर्व प्रवेश दाराशी जाऊन उभा राहा.
२०
लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता,
२१
याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका.
२२
शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options