मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह १७:१-४

यहूदाचे कोरलेले पाप व येऊ घातलेली शिक्षा

यिर्मयाह १७:१-४
“त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,
घनदाट वृक्षाजवळ आणि उंच डोंगरावरील, प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात.
या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे.
तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options