Skip to content
यिर्मयाह १६:१६-१८

यिर्मयाह १६:१६-१८

१६
“परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील.
१७
कारण माझी नजर तुझ्या सर्व मार्गावर लक्ष ठेऊन आहे; ते माझ्यापासून लपू शकत नाही, आणि त्यांचे कोणतेही पाप माझ्या नजरेतून सुटत नाही.
१८
त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options