यशायाह ६५:२-५
२
ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,
३
हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;
४
जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; जे डुकरांचे मांस खातात, आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो;
५
जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो.
Settings