यशायाह ६५:१-३
१
“ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले; ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे. ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’
२
ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,
३
हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings