यशायाह ४९:१८-२३
१८
तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल.
१९
“जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते आणि जी तुमची भूमी उजाड झाली, ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल, आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील.
२०
विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला असे म्हणताना तुम्ही ऐकाल, ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’
२१
तेव्हा तू मनात म्हणशील, ‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले? मी दुःखी व निर्वंश होते; मी बंदिवासात व नाकारलेली होते. माझ्यासाठी यांना कोणी वाढविले? मला एकटेच टाकण्यात आले होते, मग हे सर्व—कुठून आले?’ ”
२२
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन, मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन; ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील.
२३
राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”
Settings