यशायाह ४१:२६-२९
२६
हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ कोणीही हे सांगितले नाही, कोणीही हे भविष्य केले नाही, कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही.
२७
मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला.
२८
मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते— तुमच्या दैवतांपैकी कोणीही सल्ला दिला नाही, मी विचारले तेव्हा त्यांच्यातील कोणीही उत्तर दिले नाही.
२९
पाहा, ती सर्व खोटी आहेत! त्यांची कामे व्यर्थ आहेत; त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.
Settings