यशायाह २७:२-६
२
त्या दिवशी— “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा:
३
मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.
४
मी रागावलेलो नाही. परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; मी त्या सर्वांना आग लावली असती.
५
नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”
६
येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, इस्राएलला अंकुर फुटेल आणि ती बहरेल आणि सर्व जगास फळांनी भरेल.
Settings