Skip to content
यशायाह २१:६-९

यशायाह २१:६-९

प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.
जेव्हा तो रथांना घोड्यांच्या ताफ्यासहीत, आणि गाढवावर स्वार असलेले किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, तेव्हा त्याने सावध राहावे, पूर्णपणे सावध राहावे.”
त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.
पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options