Skip to content
यशायाह २०:२-६

यशायाह २०:२-६

२
त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.
३
तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,
४
म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.
५
ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.
६
त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options