यशायाह १६:३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३ दाखवत आहे.
१
देशाच्या अधिपतीकडे सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत खंडणी म्हणून कोकरे पाठवा.
२
घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.
३
मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा, निर्णय द्या. तुमची सावली रात्रीसारखी करा— भर दुपारच्या वेळेसारखी. पलायन केलेल्यांना लपवा, शरणार्थी लोकांचा विश्वासघात करू नका.
४
पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.
५
प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; दावीदाच्या घराण्यातील एकजण, विश्वासूपणाने त्यावर बसेल— जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.
६
मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे— तिचा अहंकार किती मोठा आहे! तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा; परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत.
Settings