यशायाह १३:६-९
६
आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.
७
या कारणामुळे सर्वांचे हात शक्तिहीन होतील, प्रत्येकाचे हृदय भीतीने वितळून जाईल.
८
दहशत त्यांच्यावर झडप घालेल, वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील; प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील. भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील, त्यांचे चेहरे होरपळतील.
९
पाहा, याहवेहचा दिवस येत आहे —एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा— भूमी उजाड करण्यासाठी आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी.
Settings