Skip to content
इब्री ९:१५-२२

नवीन करारासाठी रक्ताची आवश्यकता

इब्री ९:१५-२२
१५
याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.
१६
कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे.
१७
मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही.
१८
या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही.
१९
जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.
२०
मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”
२१
आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले.
२२
खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options