Skip to content
इब्री ७:११-१७

इब्री ७:११-१७

११
जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्‍या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा?
१२
जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे.
१३
कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती.
१४
हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही.
१५
आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल.
१६
ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्‍या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले;
१७
हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options