Skip to content
इब्री १०:११-१८

ख्रिस्ताच्या एकमेव अर्पणाची अंतिमता

इब्री १०:११-१८
११
प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.
१२
परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत.
१३
आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत.
१४
कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.
१५
याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:
१६
“मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”
१७
मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”
१८
आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options