हाग्गय २:१-३
१
सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी, हाग्गय संदेष्ट्याद्वारे याहवेहचे हे वचन आले:
२
शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, यहूदीयाचा राज्यपाल व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक आणि देशातील अवशिष्ट लोकांशी बोल. त्यांना विचार,
३
“या भवनाची पूर्वीची भव्यता कशी होती हे सांगण्यास तुमच्यातील कोणी उरले आहे काय? हे सध्याचे काहीच नाही असे तुम्हाला वाटते ना?
Settings