Skip to content
हाग्गय १:१२-१४

हाग्गय १:१२-१४

१२
तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले.
१३
मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात.
१४
याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options