हबक्कूक २:५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५ दाखवत आहे.
२
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.
३
कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.
४
“बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.
५
खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.
६
“ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’
७
तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? मग तुम्ही त्यांचे सावज बनाल.
८
कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला.
Settings