उत्पत्ती ५:६-२०
६
शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला.
७
अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
८
शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
९
अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.
१०
केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
११
अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
१२
केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.
१३
महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
१४
केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
१५
महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.
१६
यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
१७
महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
१८
यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.
१९
हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
२०
यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
Settings