उत्पत्ती ४५:९-१५
९
आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या.
१०
म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल.
११
मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’
१२
“तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे.
१३
आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.”
१४
मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला.
१५
मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.
Settings