मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती ४०:२०-२३

पूर्तता आणि योसेफचा विसर

उत्पत्ती ४०:२०-२३
२०
आता तिसर्‍या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले:
२१
यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला—
२२
परंतु प्रमुख रोटी भाजणार्‍याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली.
२३
मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options