उत्पत्ती ३४:५-७
५
आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.
६
मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला.
७
तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
Settings