उत्पत्ती २:२-५
२
परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली.
३
सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.
४
याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली.
५
जमिनीवर अद्याप वनस्पती उगवली नव्हती, कारण याहवेह परमेश्वराने अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी मनुष्य नव्हता.
Settings