Skip to content
गलातीकरांस २:१५-१८

गलातीकरांस २:१५-१८

१५
“जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही.
१६
हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.
१७
“ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? नक्कीच नाही.
१८
जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options