Skip to content
यहेज्केल ७:१-९

यहेज्केल ७:१-९

याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्‍यांवर शेवट आला आहे!
आता तुमचा शेवट आला आहे, आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी खचितच तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही अशी विपत्ती पाहा, ती येत आहे!
अंत आला आहे! अंत आला आहे! तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे. पाहा, तो येत आहे!
तुम्ही जे देशात राहतात, त्या तुमच्यावर विनाश आला आहे. समय आला आहे! दिवस जवळ आहे! डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.
मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options