Skip to content
यहेज्केल ४४:९-१६

यहेज्केल ४४:९-१६

सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हृदयाने व शरीराने बेसुंती असे विदेशी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करणार नाहीत, जे विदेशी इस्राएलात राहतात त्यांनी सुद्धा येऊ नये.
१०
“ ‘इस्राएली लोक बहकले तेव्हा जे लेवी माझ्यापासून भरकटले व दूर गेले आणि त्यांच्या मूर्तींच्या मागे गेले ते त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगतील.
११
मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील.
१२
परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१३
त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी.
१४
मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन.
१५
“ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१६
केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options