Skip to content
यहेज्केल ३७:१९-२८

यहेज्केल ३७:१९-२८

१९
त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’
२०
ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर
२१
आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोक ज्या राष्ट्रांमध्ये गेले आहेत, तिथून मी त्यांना बाहेर काढेन. चहूकडून मी त्यांना एकवटेन आणि त्यांना स्वदेशात आणेन.
२२
मी त्यांना या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर एक राष्ट्र असे करेन. त्या सर्वांवर एक राजा असणार आणि ते यापुढे दोन राष्ट्र नसतील किंवा ते दोन राज्यांमध्ये विभागले जाणार नाहीत.
२३
आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
२४
“ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील.
२५
माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल.
२६
मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.
२७
माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.
२८
जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options