यहेज्केल ३७:१-६
१
याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते.
२
त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती.
३
याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”
४
तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका!
५
या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.
६
मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
Settings