यहेज्केल ३६:२४-२७
२४
“ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन.
२५
मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन.
२६
मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन.
२७
आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन.
Settings