Skip to content
यहेज्केल ३२:२४-३२

यहेज्केल ३२:२४-३२

२४
“एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत.
२५
वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे.
२६
“मेशेख व तूबाल तिथे आहेत आणि त्यांचे सैन्य त्यांच्याभोवती आहेत. जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला ते सर्व बेसुंती आहेत, म्हणून ते तलवारीने वधले आहेत.
२७
परंतु त्यांच्या आधी मेलेल्या दुष्ट पुरातन बेसुंती योद्ध्यांबरोबर ते निजलेले नाहीत, जे त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांसह खाली अधोलोकात गेले; ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली व त्यांच्या ढाली त्यांच्या हाडांवर आहेत; या योद्ध्यांनी सुद्धा जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला होता.
२८
“हे फारोह, तू सुद्धा मोडला जाशील व जे तलवारीने वधले आहे, त्या बेसुंत्यांबरोबर जाऊन पडशील.
२९
“एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.
३०
“उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत.
३१
“फारोह व त्याचे सर्व सैन्य त्यांना पाहतील आणि तलवारीने वधलेल्या त्याच्या सर्व सैन्यांसाठी तो सांत्वन पावेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
३२
जरी जिवंताच्या भूमीवर फारोहचे भय मी पसरविले होते, तरीही फारोह व त्याचे सर्व सैन्य जे लोक तलवारीने वधलेले, सुंता न झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options