यहेज्केल ३२:१-३
१
बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्यात चिखल केलास.
३
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील.
Settings