मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ३०:१०-१९

बाबेलकडून बजावला जाणारा न्याय

यहेज्केल ३०:१०-१९
१०
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन.
११
तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत; त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल. ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील.
१२
नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन; विदेशी लोकांच्या हातून मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन. मी याहवेह हे बोललो आहे.
१३
“ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.
१४
इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, सोअन नगराला आग लावेन आणि नओ नगराला दंड देईन.
१५
सीन जो इजिप्तचा बळकट दुर्ग, यावर मी माझा कोप ओतेन, आणि नओचे सैन्य नष्ट करेन.
१६
मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील.
१७
ओन व पी-बेसेथचे तरुण पुरुष तलवारीने पडतील, आणि शहरे बंदिवासात जातील.
१८
तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील.
१९
याप्रकारे मी इजिप्तवर दंड आणेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options