Skip to content
यहेज्केल २८:१५-१९

यहेज्केल २८:१५-१९

१५
तुझी निर्मिती झाली तेव्हापासून तुझ्यात दुष्टता आढळली तोपर्यंत तू तुझ्या मार्गात सरळ होता.
१६
तुझ्या विस्तारित व्यापारामुळे तू आतंकाने भरला आणि तू पाप केले. म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, आणि हे संरक्षक करुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले.
१७
तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.
१८
तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. म्हणून तुझ्यातून अग्नी येईल आणि तुला भस्म करेल असे मी केले, आणि सर्व बघणार्‍यांच्या देखत मी तुला राखेत मिळविले.
१९
ज्या सर्व राष्ट्रांना तुझी ओळख होती ते तुला पाहून भयभीत झाले आहेत; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्व नाहीसे झाले आहे.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options