Skip to content
यहेज्केल २८:१२-१५

यहेज्केल २८:१२-१५

१२
“मानवपुत्रा, सोरच्या राजासाठी विलाप कर आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तू पूर्णतेची मुद्रा होता, जो ज्ञानाने भरलेला व सौंदर्याने परिपूर्ण होता.
१३
तू एदेन बागेत, परमेश्वराच्या बागेत होतास; प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, गोमेद, यास्फे आणि नीलमणी, पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते.
१४
संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले, म्हणून मी तुझी नेमणूक केली. परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर होता; आणि तू अग्निपाषाणात फिरत असे.
१५
तुझी निर्मिती झाली तेव्हापासून तुझ्यात दुष्टता आढळली तोपर्यंत तू तुझ्या मार्गात सरळ होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options